Sunday, July 20, 2025
Homeweather updateवीज व ढगांच्या गडगटासह पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची हजेरी

वीज व ढगांच्या गडगटासह पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची हजेरी

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार सुरू असलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, भोसरीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुचाकी रॅली नियोजित आहे. तर मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे राजकीय सभा आणि प्रचार रॅली रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments