राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि भाजप उमेदवार अश्विनी जगताप हे रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी राहुल कलाटे यांचेही नाव चर्चेत होते. पण ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले आहेत. अशातच शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष लढणार असल्याचे विधान केले आहे.
याबाबत त्यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. त्यामुळे मतदार मलाच सहानुभूती दाखवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच राहुल कलाटे यांनी मतदार सहानुभूती दाखवण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. २०१४ची विधानसभा कलाटे यांनी शिवसेनेकडून लढली होती. तर २०१९ची विधानसभा निवडणूक ते अपक्ष म्हणून लढले होते.