Sunday, August 16, 2026
Homeताजी बातमीअखेर राहुल गांधीं याचं ट्विटर अकाऊंट अनलॉक…

अखेर राहुल गांधीं याचं ट्विटर अकाऊंट अनलॉक…

१४ ऑगस्ट २०२१,
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट अखेर अनलॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्यासहित काँग्रेसच्या इतर नेत्यांचंही ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरळीत करण्यात आलं आहे. दिल्लील बलात्कार करुन हत्या झालेल्या नऊ वर्षाच्या पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानंतर ट्विटरने अकाऊंट बंद करत कारवाई केली होती. राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर जोरदार टीका करताना देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर लगेचच ट्वीटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे.

“काँग्रेसची सर्व अकाऊंट्स अनलॉक करण्यात आली आहेत. यासाठी ट्विटरकडून कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही,” अशी माहिती काँग्रेसच सोशल मीडिया अकाऊंट इन-चार्ज रोहन गुप्ता यांनी दिली आहे. याआधी ट्विटरने बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे फोटो शेअर करणं नियमांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं.

याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विटरवर आरोप करत देशाच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचं म्हटलं होतं. तसंच हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला असल्याचीही टीका केली होती.

दिल्लीतील नांगल येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेच्या कुटुंबीयांना राहुल यांनी भेट दिली होती व त्याचे छायाचित्र ट्वीट केले होते. याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर कंपनीने राहुल यांचे ट्विटर खाते ६ ऑगस्टला बंद केले होते. ट्विटरने सात दिवसांनंतरही हे खाते सुरू केले नसल्याने राहुल गांधी यांनी ट्विटरच्या ‘हस्तक्षेपा’वर आक्षेप नोंदवत शुक्रवारी टीका केली. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या २३ नेत्यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली होती.

राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरची कारवाई ही राजकीय प्रक्रियेतील हस्तक्षेप आहे. एखादी कंपनी राजकीय परिभाषा ठरवू शकत नाही. ट्विटर खाते बंद करणे हा लोकशाही चौकटीवरील हल्ला आहे. माझे २ कोटी फॉलोअर्स असून त्यांना आपले विचार मांडण्यापासून ट्विटर वंचित ठेवत आहे. आता ट्विटर तटस्थ व्यासपीठ राहिलेले नाही, ते पक्षपाती बनलेले आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments