१८ जानेवारी २०२०,
केएल राहुलने राजकोट वन डेत मधल्या फळीत भक्कम फलंदाजी केली. ५२ चेंडूत त्याने ८० धावा केल्या आणि भारतीय संघाला ३४० धावांपर्यंत मजल मारण्यात मोलाचं योगदान दिलं. भारताने यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव ३०४ धावात गुंडाळला. या विजयासोबतच भारताने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतावर मुंबईतील सामन्यात १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला होता. आता अखेरचा निर्णायक सामना रविवारी बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
संघाला हवी तशी आणि तेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणं हे निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर राहुलचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन होतं. या खेळीने त्याची परिपक्वता आणि स्तर दाखवून दिला. यावेळी विराटने राहुल चे तोंडभरून कौतुक केले, आम्ही ड्रेसिंग रुममध्ये काय करतो ते आम्हाला माहित असतं. मैदानाच्या बाहेर बरीच चर्चा होते, पण आम्ही त्याकडे लक्ष देत नाही’, असंही विराट कोहली म्हणाला.