Saturday, March 22, 2025
Homeआंतरराष्ट्रीयRafale Deal : फ्रान्सच्या Dassault ने फेटाळले घोटाळ्याचे आरोप! स्पष्टीकरण देत म्हणाले...

Rafale Deal : फ्रान्सच्या Dassault ने फेटाळले घोटाळ्याचे आरोप! स्पष्टीकरण देत म्हणाले…

Rafale करारामध्ये डसॉल्टने एका भारतीय मध्यस्थाला सुमारे १० लाख युरो दिल्याचा खळबळजनक दावा फ्रेंच ऑनलाईन जर्नल (Mediapart) मिडीयापार्टने आपल्या वृत्तात केला. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले होते. मात्र, असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचं डसॉल्टने ठामपणे म्हटलं आहे. आपल्या या दाव्यासाठी डसॉल्टकडून फ्रान्समधल्या अनेक संस्थांकडून केल्या जाणाऱ्या तपासणीचा हवाला दिला आहे. 

Mediapart ने आपल्या वृत्ताला फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी कारवाया करणारी संस्था Agence Francaise Anticorruption (AFA) ने केलेल्या तपासाचा आधार दिला आहे. त्यामुळे यामध्ये तथ्य असल्याचं बोललं जात आहे. मात्र, हे सर्व आरोप डसॉल्टने पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “सरकारी अधिकारी, फ्रान्सची भ्रष्टाचारविरोधी संस्था यांनी मिळून या कराराचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा घोटाळा झाल्याचं सापडलेलं नाही. भारताला ३६ राफेल विमानं देण्यासंदर्भातल्या करारात कोणताही गैरप्रकार झालेला नाही”, असं डसॉल्टकडून सांगण्यात आलं आहे.

“२००० सालापासूनच डसॉल्टने भ्रष्टाचार, नैतिक तत्व, बाजारातली आपली पत राखण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू केली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट अर्थात OECD चे सर्व नियम आणि करार आम्ही पाळतो”, असं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments