Tuesday, December 10, 2024
Homeगुन्हेगारीसाई भक्तांवर काळाचा घाला; बस, ट्रकच्या भीषण अपघातात 10 ठार

साई भक्तांवर काळाचा घाला; बस, ट्रकच्या भीषण अपघातात 10 ठार

शिर्डीमधून मोठी बातमी समोर येत आहे. ट्रक आणि लक्झरीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिन्नर -शिर्डी मार्गावर पाथरे परिसरात हा अपघात झाला. ट्रॅव्हल बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून, बसमधील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी सिन्नर -शिर्डी मार्गावर पाथरे परिसरात ट्रक आणि लक्झरीचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या या धडकेमध्ये दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या अपघातामध्ये बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिन्नर शिर्डी मार्गावर असलेल्या पाथरे परिसरात हा अपघात झाला आहे. मात्र या अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही अपघातग्रस्त वाहनांचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात झाला तेव्हा प्रवाशांनी बचावासाठी एकच अकांत केला. आवाज ऐकूण स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments