अभिनेता अल्लू अर्जुनच्यापुष्पा-२ म्हणजेच ‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘पुष्पा द राईज’ मधला पुष्पाचा तो लूक आणि त्या पात्रांची स्टाईल लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता पुढच्या पार्टमध्ये काय असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काही दिवसांपुर्वीच ‘पुष्पा २’ चे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले.
नव्या पोस्टरवरील अल्लु अर्जूनचा लूक, त्यानं बोटावर लावलेली नेलपॉलिश हे सारं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा हात रक्ताने माखलेला दिसतोय. त्याच्या हाताच्या करंगळीवर नेल पेंट आणि तीन अंगठ्या लक्ष वेधून घेतात. या अंगठ्या सध्या चर्चेत आल्या आहेत. आता प्रश्न हा उठतो की अल्लू अर्जुनच्या हातातील या अंगठ्यांचा अर्थ काय?
अल्लू अर्जूनने करंगळीत रूबी-पन्ना क्वार्ट्जची अंगठी घातलेली दिसतीय. तर नखावर नेल पेंट आहे. ज्योतिषांच्या मते, रुबी आणि पन्ना एकत्र केल्याने नशीब फळफळते. तर दुसऱ्या बोटातील अंगठीत नवरत्न दिसत आहे. नवरत्न अंगठी धारण केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धैर्य आणि उत्साह वाढतो. आर्थिक समृद्धी, व्यावसायिक वाढ आणि चांगल्या आरोग्याची ही अंगठी प्रतिक आहे. तर अल्लू अर्जूनच्या तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी दिसतेय. शिवाय, हात सोन्याच्या आणि हिऱ्याच्या बांगड्यांनी भरलेला दिसतोय. तर दुसऱ्या हातात घड्याळ आणि ब्रेसलेट पाहायला मिळत आहे. अल्लूच्या या लूकनं तर चाहत्यांना वेडं केलं. चाहत्यांनी मेकर्सला हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा असे आवाहन केले आहे.
‘पुष्पा: द राइज’ १७ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटामधील अल्लू अर्जुनच्या झुकेगा नहीं साला या डायलॉगची प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण झाली होती. या चित्रपटानंतर आता ‘पुष्पा २’ची गेले कित्येक दिवस प्रेक्षक वाट पाहत आहेत. स्वांतत्र्यदिनाच्या मुहुर्तावर पुष्पाचा सीक्वल प्रदर्शित केला जाणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ या दिवशी ‘पुष्पा २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटात अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना, फहद फॉसिल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.