खडक पोलीस ठाण्यात हद्दीत कासेवाडी भागात एक टोळकी जन्मदिवस साजरा करत परिसरात जोडरदार राडा घातला आहे. यावेळी भाईने वाढदिवसाच्या वेळी असं काही केलं की आता त्याला ही बाब चांगलीच महागात पडली आहे. दिनांक ०९ एप्रिल रोजी कासेवाडी भागात आतिष लांडगे याने हातात कोयता घेवून वाढदिवसाचा केक कापून आरडा-ओरडा करत राडा केला. याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकल्याची बातमी मिळाल्याने बातमीचा आशय वरिष्ठांना कळविला.
या प्रकरणी वरिष्ठांच्या परवानगीने कारवाही करत. सदर इसमास काशिविश्वनाथ महादेव मंदिरासमोर काशेवाडी पुणे इथे ताब्यात घेण्यात आला आहे. आतिष जालिंदर लांडगे (वय २६ वर्षे रा. काशिविश्वनाथ महादेव मंदिरा) कडून एक लोखंडी कोयता ५००/- रू. किंमतीचा माल जप्त करून त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करणात आला आहे.
सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक अजय जाधव, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर आदींनी ही कारवाई केली.