Tuesday, January 13, 2026
Homeअर्थविश्वआनंद, आशा आणि संकल्पांच्या वातावरणात पुणेकरांनी केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

आनंद, आशा आणि संकल्पांच्या वातावरणात पुणेकरांनी केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

जुन्या वर्षाच्या आठवणींना निरोप देत नव्या आशा, अपेक्षा आणि संकल्पांसह पुणेकरांनी नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहर सज्ज झाले होते. ३१ डिसेंबरच्या रात्रीपासूनच पुण्यातील वातावरणात उत्साह, चैतन्य आणि आनंदाची लहर पसरली होती.

शहरातील प्रमुख चौक, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध खासगी कार्यक्रमांमध्ये नववर्ष स्वागताचा उत्सव रंगला होता. मित्रमंडळी, कुटुंबीय आणि नातेवाइकांसोबत आनंद साजरा करत पुणेकरांनी नव्या वर्षात पाऊल टाकले. विशेषतः तरुणाईमध्ये नववर्षाच्या स्वागताचा उत्साह अधिकच पाहायला मिळाला.

तरुणाईचे आवडते ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज (एफ. सी.) रोडवर यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो तरुण-तरुणी येथे एकत्र आले होते. रंगीबेरंगी फुगे उडवत, ‘हॅपी न्यू इयर’च्या शुभेच्छा देत आणि आनंदाने जल्लोष करत तरुणाई नववर्षाचे स्वागत करताना दिसत होती. अनेकांनी मोबाईलमध्ये सेल्फी, फोटो आणि व्हिडिओ काढत हे क्षण आठवणींत साठवले.

एफ. सी. रोडसह जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर आदी भागांमध्येही नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. शहरभर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, संभाव्य गर्दी, वाहतुकीची कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रमुख ठिकाणी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नववर्षाचा जल्लोष शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडला.

आनंदआशा आणि संकल्पांच्या वातावरणात पुणेकरांनी केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments