Wednesday, January 22, 2025
Homeआरोग्यविषयकपुणेकरांनी वर्षभरात रिचवली 14 कोटी लिटर दारू ..

पुणेकरांनी वर्षभरात रिचवली 14 कोटी लिटर दारू ..

देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. कधीकाळी विविध पेठांचे शहर असलेले पुणे बदलू लागले आहे. पुण्याची चौफेर वाढ झाली आहे. अनेक मोठ मोठे टॉवर पुण्यात उभे राहिले आहे. यामुळे समृद्ध झालेले काही पुणेकर पेठा सोडून प्रशस्त घरांमध्ये गेले आहेत. पुण्याची झपाट्याने औद्योगिक वाढ झाली. त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञानाची नगरी म्हणून पुणे परिचित झाले आहे. देशभरातून पुणे शहरात नोकरी आणि उद्योगासाठी लोक येऊ लागले. काळप्रमाणे पुणे शहरात बदल होऊ लागले. पुणेकर आता मद्याच्या प्रेमात पडले आहे. यामुळे गेल्या वर्षभरात पुणे जिल्ह्यातील दारुची विक्री दुप्पट झाली आहे. पुणेकरांकडून वर्षभरात 14 कोटी लिटर मद्य प्राशन झाली आहे.

पुणे शहरात मॉर्निंग वॉकला असंख्य जण बाहेर पडतात. मॉर्निंग वॉक करताना विविध प्रकारचे ज्यूस पुणेकर पितात. अगदी कडू कारल्याचे ज्यूस पुणेकर आरोग्यासाठी पितात. मग रात्र झाली पंकज उदास यांच्या गजल प्रमाणे “थोडी थोडी पिया करो” सुरु होते. यामुळेच आता पुणे शहर आणि जिल्ह्यातील मद्यविक्री दुप्पट झाली आहे. पुणेकरांनी एकाच वर्षात 14 कोटी लिटर मद्य रिचवले आहे.

अशी वाढली मद्य विक्री
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात एप्रिल 2023 ते मार्च 2024 या वर्षभरात 14 कोटी 321 लिटर दारूची विक्री झाली आहे. त्यात मे महिन्यात जिल्ह्यात दारूची सर्वाधिक विक्री झाली आहे. मागील वर्षापेक्षा पुणे जिल्ह्यात मध्यविक्रीत दुप्पटीने वाढली आहे. यामुळे राज्य शासनाला चांगला महसूल मिळाला आहे. शासनाची तिजोरी मद्यविक्रीतून भरली आहे. दारू विक्रीतून शासनाला महसूल मिळतो. त्यामुळे दारुबंदी ही कागदावर असते.

विविध प्रकारच्या मादक पेयांमध्ये पुणेकरांची पसंती बियरला मिळाली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात बियरच्या विक्रीत तब्बल 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात बियर विक्री मध्ये 51 टक्के वाढ तर वाईन विक्रीत 31 टक्क्याने वाढ झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments