कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी केली उपाय योजना
२९ डिसेंबर ,
कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे पोलिसांकडून 250 व्हॉट्सअॅप ग्रुप्सना नोटीसा बजावल्या आहेत. ग्रुपवर कोणत्याही अफवा पसरवणारी पोस्ट व्हायरल करू नका, अशी सक्त ताकीद पुणे पोलिसांची संबंधीत ग्रुप अॅडमिन्सना दिली आहे. यापूर्वीही 163 लोकांना कोरेगाव भीमा गाव बंदी जाहीर केली होती. त्यात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा समावेश आहे. मिलिंद एकबोटे हे भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी असून ते सध्या जामिनावर आहे.
चार तालुक्यांमध्ये कलम 144
या घटनेनंतर या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणार्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्रुप्सना सेटिंग्ज बदलण्याच्या सूचना
पुणे-ग्रामीणचे अतिरिक्त एसपी जयंत मीना यांनी सांगितले की, भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2020 रोजी होणार्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 250 हॉट्सअॅप ग्रुप्सना नोटीस पाठवण्यात आले आहेत. अफवा पसरवणर्या ग्रुप्सना इशारा देण्यात आला आहे. संबंधीत ग्रुप अॅडमिन्सना सेटिंग्ज बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन मेसेजेसचे नियमन करता येईल. समाजाच्या भावना दुखावणार नाही, अशा पोस्ट ग्रुपवर टाकू नये, अशा सूचना ग्रुप सदस्यांना देण्यास अॅडमिन्सना बजावण्यात आले आहे.