१२ जुलै २०२१,
पुण्यात अजूनही कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात तेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणारे आणि शनिवार-रविवारी पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या आदेशानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईअंतर्गत पुणे पोलिसांनी ४०० हून अधिक लोकांकडून दंड आकारला आहे.
शनिवारी (10 जुलै) संध्याकाळपर्यंत कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ४२४ जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी एका दिवसात जवळपास १,९९,६०० दंडाची रक्कम गोळा केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं या संदर्भातली माहिती दिली आहे.
शनिवार आणि रविवार विकेंन्ड लॉकडाऊन असूनही, लोणावळ्यात अनेक लोकांनी गर्दी केली. आम्ही लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी पोलीस तैनात केले आहेत. निर्बंध असतानाही लोणावळ्यात येणाऱ्या १०० पर्यटकांवर कारवाई करत पोलिसांनी ४७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, पुणे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनीही माहिती दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड किल्ला, पानशेत धरण, भोर, वेल्हा, कामशेत आणि जुन्नर यासारख्या प्रसिद्ध मान्सून पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सकाळपासूनच पोलिसांनी जिल्ह्यातील ४२४ पर्यटकांकडून दंड आकारण्यात आला आहे. या दंडाची रक्कम जवळपास १ लाख ९९ हजार ६०० रुपयांवर गेली आहे.