Tuesday, July 16, 2024
Homeताजी बातमीपुणे पीएमपीएलने बाप्पाच्या दर्शनासाठी घेतला मोठा निर्णय..

पुणे पीएमपीएलने बाप्पाच्या दर्शनासाठी घेतला मोठा निर्णय..

पुण्यात गणेशोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांना तत्काळ बससेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) गणेशोत्सवातील दहा दिवस ९२४ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. पीएमपीची बस सेवा रात्रभर सुरू राहणार आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांना पाच रुपये जादा द्यावे लागणार आहेत.

यंदा ‘पीएमपी’कडून २० ते २८ सप्टेंबरदरम्यान पुण्यातील भाविकांना तत्काळ बससेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने ६५४ जादा बस मार्गावर सोडण्यात येणार आहे, तर पिंपरी-चिंचवड येथून २७० बस सोडल्या जाणार आहेत. या काळात पीएमपीची सेवा २४ तास सुरू राहणार आहे.

पुण्यातून बस सुटणारे डेपो व मार्ग

 • स्वारगेट बस स्थानक : कात्रज, धनकवडी, भारती विद्यापीठ, नऱ्हे, आंबेगाव, जांभुळवाडी, अप्पर इंदिरानगर, मार्केट यार्ड, पुणे स्टेशन, सांगवी, आळंदी, वडगाव, धायरी व गरजेनुसार सिंहगड, खानापूर,हडपसर, कोंढवा हॉस्पिटल.
 • म.न.पा. स्थानक : लोहगांव, वडगांवशेरी, मुंढवागांव/केशवनगर, शुभम सोसायटी, आनंद पार्क, तळेगांव ढमढेरे, हडपसर. भोसरी, चिंचवड, निगडी, देवाची आळंदी, देहूगांव, विश्रांतवाडी, पाषाण,सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगेगांव, तळेगाव दाभाडे, सांगवी, पिंपळे गुरव,आकुर्डी रेल्वे स्टेशन,कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, कोथरूड डेपो.
 • पुणे स्टेशन /मोलेदिना स्टेशन : विश्रांतवाडी, लोहगांव, वाघोली, विमाननगर, वडगांव शेरी, आळंदी.
 • हडपसर गाडीतळ : स्वारगेट, पुणे स्टेशन, मनपा भवन, सासवड, ऊरळी कांचन, मांजरी,थेऊर, फुरसुंगी, देवाची ऊरूळी.
 • महात्मा गांधी बस स्थानक कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक , साळुंके विहार.
 • डेक्कन जिमखाना : कर्वेनगर, माळवाडी, एनडीए १० नं. गेट, गोखलेनगर, कोथरूड डेपो.
 • निगडी बस स्थानक: म.न.पा. भवन करीता.
 • भोसरी बस स्थानक : म.न.पा. भवन करीता.
 • चिंचवडगांव बस स्थानक : म.न.पा. भवन करीता.
 • पिंपरी चिंचवड येथून सुटणाऱ्या अतिरिक्त बस :
 • निगडी- ७० बस
 • चिंचवडगाव- ३५ बस
 • भोसरी- ६२ बस
 • पिंपळे गुरव – २० बस
 • सांगवी – १५ बस
 • आकुर्डी रेल्वे स्टेशन – १६बस
 • चिंचवडगाव मार्गे डांगे चौक – ३० बस
 • मुकाई चौक रावेत- १२ बस
 • चिखली/संभाजीनगर – १० बस

मेट्रोचे नियोजन काय?

शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मध्यवर्ती भागांत गणपती पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पीएमपी रात्रभर सुरू राहणार असताना पुणे मेट्रो पहिल्या दिवसापासून रात्री १२पर्यंत उपलब्ध असेल का, याची कोणतीही माहिती अद्याप ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ने (महामेट्रो) दिलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेशोत्सवात मेट्रो रात्री १२पर्यंत सुरू ठेवा, अशा सूचना मेट्रो प्रशासनाला दिल्या होत्या. मंगळवारपासून उत्सव सुरू होणार असून, रात्री १० ते १२दरम्यान मेट्रोचे नियोजन काय असेल, याची कल्पनाच अद्याप पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments