Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीपुणे, पिंपरी चिंचवडकरांचा मेट्रोतून प्रवासासाठी प्रचंड उत्साह...! मेट्रोतून प्रवासासाठी केली मोठी गर्दी

पुणे, पिंपरी चिंचवडकरांचा मेट्रोतून प्रवासासाठी प्रचंड उत्साह…! मेट्रोतून प्रवासासाठी केली मोठी गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोसोबतच इतर काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी स्वत: मेट्रोमधून प्रवास करत नागरिकांना प्रवासासाठी मेट्रो खुली करून दिली. यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्रचंड उत्साह दाखवत पहिल्याच दिवशी मेट्रोतून प्रवासासाठी मोठी गर्दी केली.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्याच्या दृष्टीने, मागील कित्येक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेला पुण्यातील गरवारे कॉलेज ते आनंदनगर आणि चिंचवड येथील पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो प्रकल्प आज मार्गी लागला आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे उद्घटान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अनेक वर्षांपासून शहरात मेट्रो केव्हा धावणार अशी चर्चा सुरू होती आणि आज ती अखेर धावली. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम झाल्यावर, काही वेळाने प्रवाशांच्या सेवेसाठी मेट्रो धावली. त्यावेळी बच्चे कंपनीपासून जेष्ठ नागरिक मोठ्या उत्साहाने मेट्रो स्टेशनमध्ये दाखल झाले होते. अनेक जण मेट्रोच्या आसपास कुटुंबीय किंवा मित्र मंडळी समवेत सेल्फ काढताना दिसत होते. प्रत्येक नागरिक खूप उत्साही आणि आनंदी दिसत होता.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया..असा जयघोष नागरिकांमधून ऐकायला मिळत होता. प्रवाशांचा एवढा उत्साह पाहून मेट्रो अधिकार्‍यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. पुणेकर आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांच्या आजचा प्रतिसाद पाहून मेट्रो अधिकार्‍यांना आणखी झपाट्याने पुढील तयारी करावी लागणार हे निश्चित मानले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments