Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीपुण्यात शनिवारपासून रंगणार ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा '

पुण्यात शनिवारपासून रंगणार ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा ‘

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामविलास पासवान प्रणित लोकजनशक्ती पार्टी यांच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व कार्यकर्त्यांना खुले असणारे विचारांचे आदान-प्रदान करणारे कट्टा व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.या व्यासपीठाला ‘पुणे मनपा निवडणूक इच्छूक कट्टा’ असे नाव देण्यात आले आहे. शहराचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ११ डिसेंबर, रोजी सकाळी १० वाजता अण्णा इडली हॉटेल मार्केट यार्ड गेट जवळ येथे या उपक्रमाच्या उद्घाटन आहे. लोकजनशक्ती पार्टी​ पुणे शहर-​​जिल्हा ​​अध्यक्ष​​ संजय ​आल्हाट,​प्रदेश सरचिटणीस​ अमर पुणेकर​,​​उपक्रमाचे समन्वयक ​डॉ​. दीपक बीडकर​ यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ​​

उद्घाटन कार्यक्रमाला पुण्यातील राजकीय नेते आणि कट्टा संस्कृतीतील अग्रणी डॉ. सतीश देसाई,(काँग्रेस नेते आणि वाडेश्वर कट्टा प्रणेते),अंकुश काकडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते,वाडेश्वर कट्टा प्रणेते),अॅड.गणेश सातपुते (मनसे नेते,वैशाली कट्टा,पुणे कट्टा प्रणेते)उपस्थित राहणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी इच्छूक उमेदवारांना मार्गदर्शन व्हावे,निवडणूक तयारीबद्दल आदानप्रदान करता यावे,सर्वपक्षीय विचारांची देवाणघेवाण व्हावी,शहरातील वातावरण द्वेषमुक्त राहावे.याकरिता हा कट्टा सुरू करण्यात येत आहे. एकेकाळी ‘मंडई’ हाच सामाजिक-राजकिय कार्यकर्त्याचा कट्टा हा वैचारिक आदान प्रदानाचा ठिय्या होता, आता विस्तारित पुण्याचा ‘मार्केट यार्ड कट्टा’ हा देखील ठिय्या व्हावा,असा मनोदय आहे,असे संजय आल्हाट यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments