Sunday, October 6, 2024
Homeराजकारणपुणे मनपाने ऐतिहासिक भिडे वाड्याचा घेतला ताबा, पोलिस बंदोबस्तात रातोरात फत्ते केली...

पुणे मनपाने ऐतिहासिक भिडे वाड्याचा घेतला ताबा, पोलिस बंदोबस्तात रातोरात फत्ते केली मोहीम…

मुलींची देशातील पहिली शाळा पुण्यातल्या ज्या भिडे वाड्यात सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीनदोस्त केला आहे. गेल्याच महिन्यात सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्ट फेटाळून लावली आणि भिडे वाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे मनपाने ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा घेतला. मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोहिम रातोरात फत्ते केली गेली. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाईल.

क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवार पेठ येथील तात्याराव भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या चोवीस भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.

भिडेवाडा पालिकेकडे हस्तांतरित करा, कोर्टाचा आदेश
या निकाला विरोधात भाडेकरूनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या वाड्याबाबत पालिकेने सर्वोच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल केली आहे. या संदर्भात गुरुवारी सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाडा संदर्भातील याचिका फेटाळली. 13 वर्षे या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करून याचिका करतांना तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न केला. एका महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा, असा आदेश दिला. तसेच असे न केल्यास महापालिका जबरदस्तीने भूसंपादन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

देशातील पहिली मुलींची शाळा..
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या भिडेवाड्याचे आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा शेवटचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा भिडे वाड्यात विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु होणार आहे. या वाड्यात पुन्हा शाळा सुरु व्हावी, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments