पुणे सराफ असोसिएशनच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग २०२२” क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. सहकारनगर येथील शिंदे हायस्कुलच्या क्रिकेट मैदानावर झालेल्या ३४ सामन्यांच्या रंगतदार आणि चुरशीच्या खेळात पुरुष गटात दिलीप सोनिगरा रॉयल्स तर महिला गटात गांधी रॉयल एंजेल्सने बाजी मारत सुवर्ण करंडकावर आपले नाव कोरले.
क्रिकेटसारख्या खेळांमुळे संघ शक्तीचे सामर्थ्य लक्षात येऊन परस्परांतील नातेबंध अधिक दृढ होतात. या स्पर्धेमुळे पुण्यातील सराफांच्या पाल्यांना एकत्र येऊन खेळण्याची मिळालेली संधी निश्चितपणे त्यांच्यातील एकी वृद्धिंगत करणारी ठरेल. स्पर्धेच्या प्रथम वर्षातच मिळालेला हा उस्फुर्त प्रतिसाद कौतुकास्पद आहे.
यावेळी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचे मा. दिलीप सोनिगरा , मा. महापौर मुरलीधर मोहोळ , मा. नगरसेवक महेश वाबळे, असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव अमृत सोलंकी, खजिनदार कुमारपाल सोळंकी, उपसचिव राजेंद्र वायकर, स्पर्धेचे संयोजक अंकित शोंड, अभिषेक मुथा, कुणाल सिरोया, विपुल अष्टेकर आदी उपस्थित होते.


