Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीपुण्यात तीन दिवसीय कारगिल महोत्सवाचे आयोजन…

पुण्यात तीन दिवसीय कारगिल महोत्सवाचे आयोजन…

कारगिलला पर्यटनस्थळ बनविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘सरहद’तर्फे बुधवारपासून तीन दिवस ‘कारगिल महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सरहद’चे संस्थापक आणि अध्यक्ष संजय नहार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘लेह ऑटोनॉमस डेव्हलपमेंट कौन्सिल, कारगिल’चे चेअरमन फिरोज खान, कार्यकारी अध्यक्ष आगा सय्यद, ‘ऑल कारगिल टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन’चे अध्यक्ष महंमद अली; तसेच नगरापालिका आणि ऑलिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी पुण्यात येत आहेत, असे नहार यांनी सांगितले.

कारगिलच्या नागरिकांशी आज, बुधवारी दुपारी बारा वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघात संवादाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी कार्यकर्ते वैभव वाघ यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या कार्यक्रमात सरहद संस्थेने हुंदरमन हे कारगिलमधील गाव दत्तक घेण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पुणे-कारगिल आर्चरी अकादमीचे उद्घाटन आज महापौर निवास येथे होणार आहे. त्याआधी कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली . सायंकाळी साडेपाच वाजता एस. एम. जोशी सभागृहात ‘सरहद कारगिल महोत्सव’ होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments