Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीपुण्यात कचऱ्याच्या डब्यात सापडली नवजात मुलगी धक्कादायक घटना

पुण्यात कचऱ्याच्या डब्यात सापडली नवजात मुलगी धक्कादायक घटना

१९ डिसेंबर
विश्रांतवाडी परिसरातील ही घटना असून कचऱ्याच्या डब्यात नवजात मुलीला फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सफाई कर्मचारी महिलेला ही मुलगी कचऱ्याच्या डब्यात सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीला एका कपड्यात गुंडाळून स्नेहगढ सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आलं होतं. सफाई कर्मचारी महिलेने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने मुलीची सुटका केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं असून तिला अरुण आश्रमकडे सोपवलं आहे.

सफाई कर्मचारी लक्ष्मी ढेमरे गेल्या १९ वर्षांपासून काम करत आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्या एकता नगर परिसरात रोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी जातात. नेहमी प्रमाणे कचरा गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांना कचऱ्याच्या डब्यात कापडात गुंडाळून काहीतरी टाकलं असल्याचं दिसलं. यामध्ये एक नवजात मुलगी आहे याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. हा ओला कचरा आणि सुका याबद्दल खात्री नसल्याने त्यांनी ते सुक्या कचऱ्यात ठेवलं.यावेळी त्यांना कापडात काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवलं. “त्या कापडातून दुर्गंध येत होता. त्यात मांसाहारी अन्न असावं असं वाटल्याने मी ते उघडलं नाही. पण जेव्हा मी ते बाजूला ठेवलं तेव्हा आतमध्ये काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवलं. त्यातून आवाजही येत होता. मी माझ्या सहकाऱ्याला बोलावलं आणि ते उघडून पाहिलं. आतमध्ये नवजात बाळ असल्याचं पाहून आम्हाला धक्काच बसला. तिच्या गळ्याभोवती कपडा घट्ट बांधण्यात आला होता. बाळाला कधी ठेवलं असावं याची आम्हाला कल्पना नव्हती, पण बाळ आश्चर्यकारकपणे जिवंत होतं,” असं लक्ष्मी ढेमरे यांनी सांगितलं आहे.

लक्ष्मी ढेमरे यांनी आपले वरिष्ठ आणि पोलिसांना तोपर्यंत यांची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाळाचा ताबा घेतला.बाळाला ससून रुग्णालयात नेण्यात आलं जिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.बाळाला सध्या अरुण आश्रमाकडे सोपवण्यात आलं आहे. तसंच अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती विश्रांतवाडी पोलीस स्थानकातील अधिकाऱ्याने दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments