२४ डिसेंबर
एका २८ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तीवर सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची युगांडा देशाची असून ती तिच्या बहिणीसोबत कोंढवा परिसरात राहते. ती टुरिस्ट व्हिसावर आली असून, ती कपड्यांचा व्यवसाय करते. सोमवारी रात्री ती मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. रात्री बारा वाजता ती घरी जाण्यासाठी कॅब बुक करत होती
त्यावेळी एक तरुण बाईकवर तिच्याजवळ आला. त्याने इंग्रजीमध्ये बोलत लिफ्ट देतो, असे सांगितले. त्यामुळे तरुणी त्याच्या बाईकवर बसली. काही अंतर गेल्यानंतर त्याला एका व्यक्तीचा फोन आला. नंतर ती व्यक्ती रस्त्यात भेटली. त्यांनी तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून एका विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी दोघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्या तरुणीला तिथेच सोडून जात होते. पण, तरुणीने विनंती करून या ठिकाणी सोडून जाऊ नका,अशी विनंती केली. त्यामुळे तरुणीला त्यांनी मुख्य रस्त्यावर आणून सोडत होते. पण, मुख्य रस्त्यावर आल्यानंतर काही तरुण उभे असल्याचे पीडित तरुणीला दिसले. त्यामुळे तिने आरडा-ओरडा केला. या गडबडीत तिघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यामध्ये तरुणीच्या पायाला मार लागला. तसेच अन्य दोघे जखमी झाले. पण, तरुण त्यांच्याकडे येत असल्याचे पाहून दोघेजण दुचाकीवरून पसार झाले. तेथील तरुणांनी पीडित तरुणीला कपडे देऊन पोलिसांकडे घेऊन गेले. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही व तरूणीने सांगितेल्या क्रमांकाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.