Wednesday, May 14, 2025
Homeगुन्हेगारीधक्कादायक! पुण्यात आई मुलाच्या नात्याला काळीमा; प्रेमासाठी मुलानेच प्रेयसीच्या मदतीने आईला संपवलं

धक्कादायक! पुण्यात आई मुलाच्या नात्याला काळीमा; प्रेमासाठी मुलानेच प्रेयसीच्या मदतीने आईला संपवलं

पुण्यात प्रेमासाठी मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी मुलाला आणि त्याला मदत करणाऱ्या त्याच्या प्रेयसीलाही बेड्या घातल्या आहे. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर मुलाने स्वत: पोलिस ठाण्यात जात आईच्या खुनाची खोटी फिर्याद दिली होती. पण अधिक तपासाअंती समोर आलेल्या माहितीवरून पोलिसांनी काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणला.

विशाल राम वंजारी (वय 19, रा.माने वस्ती, वढू खुर्द, तालुका- हवेली), नॅन्सी गॅब्रिअल डोंगरे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुशीला राम वंजारी (वय 38,रा. माने वस्ती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माने वस्तीमध्ये एका महिलेचा खून झाला अशी माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी सुशीला वंजारी या मृत अवस्थेत आढळल्या. नांदेडच्या एका व्यक्तीने कर्जामुळे आईचा खून केला आणि फरार झाला असे मुलगा विशाल वंजारी पोलिसांना सांगितले. सुरूवातीला पोलिसांना त्याचं म्हणणं खरं वाटलं, त्यानुसार त्यांनी एफआयआर देखील दाखल केला. पण त्याच्या जबाबात तफावात असल्याचं पोलिसांना लक्षात येताच कसून चौकशी केल्यावर विशालने प्रेयसीच्या मदतीने आईचा खून केल्याची कबुली दिली.

विशालने पोलिसांना सांगितलं की, नॅन्सी आणि त्याचे प्रेमसंबंध होते, पण या नात्याला आई सुशीला वंजारी यांचा विरोध होता. सोमवारी दुपारी घरातून १५ हजार ५०० रुपये चोरल्यावरुन दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि कडाक्याचे भांडण झाले. याचा राग मनात धरुन विशालने प्रेयसी नॅन्सी हिच्या मदतीने चाकूने वार करून आईचा खून केला. नंतर आईचा मृतदेह घराबाहेर आणून टाकला व खून झाल्याचा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments