Wednesday, January 22, 2025
Homeआंतरराष्ट्रीयपुणे विमानतळ १६ ऑक्टोबरपासून १५ दिवस राहणार बंद

पुणे विमानतळ १६ ऑक्टोबरपासून १५ दिवस राहणार बंद

६ ऑक्टोबर २०२१,
विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी पुणे येथील लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे १६ ऑक्टोबरपासून तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पूर्णपणे मुंबई येथील विमानतळावर अवलंबून रहावे लागणार आहे. याचा आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार आहे.

हवाई दलाकडून सप्टेंबर २०२० मध्ये लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा महत्त्वाचा टप्पा २६ ऑक्टोबरपासून सुरू झाला होता आणि तेव्हापासूनच ‘लोहगाव’ वरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जवळपास वर्षभर ‘लोहगाव’वरून केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. आता ती देखील बंद होणार आहेत. हवाई दलाच्या निर्णयानुसार १६ ऑक्टोबरला सकाळपासून ३० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विमानतळ बंद करण्याची घोषणा केवळ दहा दिवस आधी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत १६ ते ३० ऑक्टोबर कालावधीत तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. लॉकडाऊन काळात तसेच रात्रीची उड्डाणे बंद केली, तेव्हा हजारो प्रवाशांना तिकीट रद्द करावे लागले होते. त्यावेळी तिकीट रकमेचा परतावा मिळविताना दमछाक झाली होती. तोच अनुभव प्रवाशांना आता येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments