भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 14 एप्रिल रोजी आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशातील सर्व कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अधिकृत आदेशाद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कार्यालयांसोबत देशभरातील औद्योगिक संस्थादेखील 14 एप्रिल रोजी बंद राहतील.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा 130 वी जयंती आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन केलं जात आहे.