Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीपुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही साधेपणाने…

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही साधेपणाने…

१३ ऑगस्ट २०२१,
आपल्या आवाहनाला एकमताने प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर मोहोळ यांनी मानले मंडळांचे आभार…

कोरोनाची दुसरी लाट पुणे शहरात ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाचाही सार्वजनिक गणेशोत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय आपण आयोजित केलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत घेण्यात आला आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक आपण आयोजित केली होती. त्यात गणेशोत्सवासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला उपमहापौर सौ. सुनीताताई वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. हेमंत रासने, आयुक्त श्री. विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विरोधी पक्षनेत्या सौ. दीपालीताई धुमाळ, काँग्रेसचे गटनेते श्री. आबा बागुल, पोलीस उपायुक्त श्री. मितेश घट्टे, श्री. सागर पाटील यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

समाजभान जपत यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्व गणेशोत्सव मंडळांचे पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. गेल्या वर्षी राज्यात सर्वात आधी आपल्या शहरानेच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही मंडळांनी सामाजिक भान जपले आहे. गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवताना कोणत्याही कार्यालयात फिरावे लागू नये, यासाठी मंडळांना ऑनलाईन परवाने दिले जाणार आहेत.
फिरत्या हौदांची संख्या गेल्या वर्षी १०८ इतकी होती, ही संख्या यंदा १५० पर्यंत वाढवणार असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयनिहाय नियोजन केले जात आहे. अमोनियम कार्बोनेटची खरेदीही यंदा दुपटीने केलेली आहे.

कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट आहेच, या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे. विसर्जनासाठी लागणारे अमोनियम कार्बोनेट आपण क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून पुरवणार आहोत. गेल्यावर्षी पुणेकरांनी गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करण्यास प्राध्यान दिले होते, यंदाही असाच प्रतिसाद पुणेकर देतील, हा विश्वास आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments