Monday, May 12, 2025
Homeताजी बातमी"आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?" स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचे सचिन तेंडुलकरच्या...

“आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?” स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचे सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निदर्शनं

८ फेब्रुवारी २०२१,
शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केल्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सामना करावा लागला होता. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील? असं म्हणत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टर झळकावले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्त्याने सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर निदर्शनं केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेश प्रवक्ता रणजीत बागल याने सचिनच्या घराबाहेर एक पोस्टर घेऊन थेट जाब विचारला आहे. ‘सचिन शेतकऱ्यांसाठी कधी ट्वीट करशील? असा फलक दाखवत बागल याने निदर्शनं केली आहे.

जगभरात लोकप्रिय असलेली पॉप स्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केलं. रिहानाच्या या ट्वीटवर उत्तर देत भारतातील अनेक सेलिब्रिटींनी तिला भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिला. यामध्ये भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचाही समावेश होता. याच मोहिमेअंतर्गत सचिननं बुधवारी ट्वीट केलं होतं. ‘देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या’, सचिननं हे ट्वीट करताच भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी या विषयावर ट्वीट करत विदेशी मंडळींना सुनावलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments