Thursday, February 6, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी- चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केली तीन तरुणींची सुटका…

पिंपरी- चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांनी केली तीन तरुणींची सुटका…

पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे निलख या ठिकाणी स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दलालाला पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलं आहे. या जाळ्यातून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी फॅमिली स्पा हा ब्रह्मावृंद कॉलनी पिंपळे निलख या ठिकाणी सुरू होता. त्या ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार, त्या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. मग पोलिसांनी सापळा रचत जया अशोक जाधव आणि निखिल मोहन नवघन या दोघांना ताब्यात घेतले. तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७० (३),३४ अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक धैरशील सोळंके, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments