Tuesday, February 18, 2025
Homeमहाराष्ट्रकर संकलन विभागाचे मालमत्ता सर्वेक्षण आर्थिक मजबुतीसाठी क्रांतिकारक ठरणार… !!

कर संकलन विभागाचे मालमत्ता सर्वेक्षण आर्थिक मजबुतीसाठी क्रांतिकारक ठरणार… !!

तब्बल 35 टक्के नव्या मालमत्ता कराच्या कक्षेत येण्याचा प्राथमिक अंदाज

आर्थिक दृष्ट्या मार्गावर येण्याची एकमेव सुवर्णसंधी

पिंपरी-चिंचवड – महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्तांचे सर्वेक्षण आणि नवीन मालमत्ता कर नोंदणी अभियान सुरू आहे. या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्ता करकक्षेत येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा निर्णय क्रांतीकारी ठरणार असून नागरिकांनी मालमत्ता कर नोंदणी अभियानाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

सध्या महापालिकेत अनेक भांडवली केंद्री प्रकल्प चालू असून भविष्यात याच्या व्यवस्थापनासाठी वाढीव निधी कुठून आणणार असा प्रश्न येत्या दोन तीन वर्षात निर्माण होणार आहे. त्यासाठी आजच पावले उचलली नाही तर पालिकेला आर्थिक अरिष्टाला तोंड द्यावे लागणार हे नक्की आहे. यासाठी उत्पन्नाचे स्थायी स्त्रोत निर्माण करणे हे तातडीचे झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊनच एकंदरीत मालमत्ता कर प्रणालीचा अभ्यास करून आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वंकष मालमत्ता आकारणीची योजना आखून त्याला मूर्त स्वरूप दिले आहे. योजनेची अंमलबजावणी होऊन फक्त तीनच महिने झाली असून आता त्याची मूर्त स्वरुप दिसू लागले आहे. हे सर्वंकष अभियान एकूणच पालिकेची आर्थिक स्थिती अमुलाग्र बदलणार अशी तरी सध्या चिन्हे आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी वर कर संकलन विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात आज अखेर 640 कोटींचा कर वसूल केला आहे. यंदा 1 हजार कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता सर्वेक्षण आणि मालमत्ता कर नोंदणी अभियानामुळे आगामी आर्थिक वर्षात मागील करांची थकबाकी आणि चालू मागणी असे मिळून 1500 कोटी रुपये महापालिका तिजोरीत जमा होण्याची शक्यता आहे.

मालमत्ता कर नोंदणी अभियानामुळे आगामी आर्थिक वर्षात महापालिकेची डिमांड दुपट्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या महापालिकेची जी आर्थिक स्थिती आहे, ती पुरेशी सक्षम नाही. या प्रकल्पामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सक्षम होणार आहे. महापालिकेचा वाढता वेग लक्षात घेता आणि विविध विकास कामांच्या प्रकल्पांना निधी पुरविणे शक्य होणार आहे. यामुळे महापालिका करदात्या नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा पुरविणे शक्य होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments