चाकण पोलीस ठाणे हद्दीत श्वास हॉस्पिटल मेदनकर वाडी, चाकण, पुणे येथील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम फोडण्याचा प्रकार चालू आहे. असा पोलीस नियंत्रण कक्ष चिंचवड येथे कॉल प्राप्त झाला त्यावरून तात्काळ सी आर ओ म्हणून उपस्थित असलेले नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक संतोष कसबे , पीएसआय दरेकर पीएसआय खताळ आणि वायरलेस सेट वरील महिला अमलमदाराने वायरलेस व मोबाईल द्वारे संपर्क साधून रात्रवस्तीची अधिकारी यांना तात्काळ संपर्क केले.
सदर ठिकाणी तात्काळ चाकण पोस्टे चे रात्रगस्त अधिकारी psi मडके तसेच अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन एटीएम सेंटरची पाहणी केली असता बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मशीनचे चेस्ट डोअर कोणीतरी अज्ञात इसमाने कशाच्या तरी साह्याने उचकटून त्यामधून एटीएम मशीन मध्ये असलेले पैसे काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.
सदर बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ivis कंपनी हैदराबाद राज्य तेलंगणा यांच्या शी संपर्क करून नियंत्रण कक्ष च्याअधिकाऱ्यांनी प्राप्त करून घेऊन सदर सीसीटीव्ही फुटेज आधारे आरोपीचे फोटो प्राप्त करून चोरीचा प्रयत्न करणारा लाल टी-शर्ट घातलेला मुलगा याचा फोटो व सीसीटीव्ही फुटेज बीट मार्शल चे अंमलदार यांना पाठवून शोध घेण्याबाबत कळवले होते. तसेच संबंधित नाईट ग्रस्त अधिकाऱ्यांना माहिती देऊन नाकाबंदी करण्यास सांगितले.
चाकण पोलीस ठाण्याचे बारा वड्या बीट मार्शल चे पोलीस अंमलदार घनवट व होमगार्ड जरे यांनी सदर सीसीटीव्ही फुटेज व फोटो याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता सदर चोरी करणारा इसम हा माणिक चौकाजवळ मिळून आला असता सदर आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मोहम्मद सर्फराज कलाम उद्दीन अंसारी वय 26 वर्ष राहणार जमरोही तालुका विक्रम गंज, जिल्हा रोहतास, राज्य बिहार असे सांगून त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे. चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.माननीय पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.