Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रअर्थव्यवस्थेची प्रगती योग्य दिशेने तसंच महागाई…”, निर्मला सीतारमण यांचं महत्त्वाचं भाष्य

अर्थव्यवस्थेची प्रगती योग्य दिशेने तसंच महागाई…”, निर्मला सीतारमण यांचं महत्त्वाचं भाष्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ५८ मिनिटांमध्ये देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आज सादर झालेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी आपली अर्थव्यवस्था खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या सगळ्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे. तसंच महागाई आहे पण ती माफक आहे असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या देशातल्या पायाभूत सुविधांवर त्यांनी भाष्य केलं आहे. अर्थव्यवस्था गतिमान करण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

सबका साथ सबका विकास हेच आमचं लक्ष्य
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला १० वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने काय काय योजना आणल्या आणि कशी प्रगती साधली याची माहिती दिली. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन मोदी सरकार पुढे गेलं आहे. नव्या योजना, रोजगार निर्मिती यावर आम्ही भर दिला. ग्रामीण विकास, घर, पाणी, स्वयंपकाचा गॅस तसंच बँक खाती उघडण्यासाठी आम्ही वेगाने कार्य केलं. तसंच ८० कोटी लोकांना निशुल्क धान्य पुरवलं. ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नांमध्ये चांगली भर पडल्याचं दिसतं आहे असंही निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

२०४७ पर्यंत देश विकसित राष्ट्र असेल
निर्मला सीतारमण म्हणाल्या, “आर्थिक सुधारणांवर भर देत आपला देश पुढे जातो आहे. २०४७ पर्यंत भारत देश हा विकसित राष्ट्र असेल यात काही शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी काम करत असताना गरीब, महिला, अन्नदाता शेतकरी त्याची प्रगती साधणं ही प्राथमिकत आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये २५ कोटी लोक हे दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. गरीब कल्याण हे देशाचं कल्याण हा मंत्र घेऊन पंतप्रधान मोदी वाटचाल करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.”

गेल्या दहा वर्षात आपल्या देशात सकारात्मक परिवर्तन पाहण्यास मिळालं आहे. भारतीय लोक आशावादी आहेत. आशावादानेच भविष्याकडे पाहत असतात. लोकांच्या आशीर्वादामुळेच २०१४ मध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तेत आलो. सबका साथ, सबका विकासचा मंत्र घेऊन आम्ही सर्व अडचणींचा सामना करायला सज्ज झालो. सरकारने या आव्हानांवर नियंत्रणही मिळवलं, असा दावाही निर्मला सीतारमण यांनी केला. गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता शेतकरी यांच्या आकांक्षा आणि गरजा भागवणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यावर आमचा सर्वोच्च भर आहे, असंही त्या आपल्या भाषणात म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments