Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीशिक्षण क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल प्रा. पांडूरंग वाघमारे यांना ‘पिंपरी चिंचवड सन्मान –...

शिक्षण क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल प्रा. पांडूरंग वाघमारे यांना ‘पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६’ गौरविण्यात आले 

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्य केल्याबद्दल प्रा. पांडूरंग लिंबाजी वाघमारे यांना ‘पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६’पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर तसेच विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

बीड जिल्ह्यातील बर्दापूर या गावातून शिक्षणाची वाटचाल सुरू करत प्रा. वाघमारे यांनी एम.ए., बी.एड., एम.फिल (हिंदी), NET (Hindi) तसेच B.M.C.J. अशा उच्च शैक्षणिक पात्रता संपादन केल्या. शिक्षण क्षेत्रात शून्यातून सुरुवात करत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे.

सन २००७ पासून खासगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात करून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळवून दिले. पुढे २०१३ मध्ये “Aspire Academy” ची स्थापना करून इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देण्याचे कार्य सुरू केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा उपक्रम त्यांनी सातत्याने राबवला.

सन २०१६ मध्ये “Little Me Pre-School” ची स्थापना करून लहान मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर २०१९ मध्ये चिखली येथील नेवाळे वस्ती येथे “S.M.N. English Medium School & Junior College” ची स्थापना करून विना डोनेशन शिक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना “टाईम्स – बळ द्या पंखांना” या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.

शिक्षण क्षेत्रात शून्यातून सुरुवात करून विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, संधी आणि आशेचे दरवाजे उघडणाऱ्या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘पिंपरी चिंचवड सन्मान – २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान मिळाल्याबद्दल प्रा. वाघमारे यांनी आयोजकांचे आभार मानत भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments