युवकांना उद्योग, व्यवसायासाठी सहाय्य करु…..आ. अण्णा बनसोडे
पिंपरी चिंचवड गुरव समाजाचा स्नेह – वधूवर मेळावा संपन्न
२ जानेवारी २०२०,
गुरव समाजाच्या मागण्यांबाबत युती सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ठरावाला आमदार प्रतिनिधी म्हणून मी अनुमोदन दिले होते. मागील तीस वर्षांपासून या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत निश्चित प्रयत्न करीन. असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.
चिंचवड येथील चैतन्य सभागृहात पिंपरी चिंचवड गुरव समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेह मेळावा व वधुवर मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी आ. लांडगे बोलत होते. यावेळी आ. अण्णा बनसोडे, माजी महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक शितल शिंदे, निलेश पांढरकर, राष्ट्रीय गुरव समाजाचे अध्यक्ष प्रताप गुरव, पिंपरी चिंचवड गुरव समाज संस्थापक अध्यक्ष प्रकाश गुरव, शहराध्यक्ष श्रीहरी गुरव, कार्याध्यक्ष धैर्यशिल गुरव, समन्वयक सिमा शिंदे, राष्ट्रीय गुरव समाजाचे सरचिटणीस मल्लिकार्जुन गुरव, शशिकांत जिड्डीमणी, मुकुंद दिडभाई, मधुकर गुरव, प्रा. सुहास पुजारी, डॉ. रमाकांत पाटील, सतिश पाटील, भानदास पांचारे, राज तापकिर, अण्णा गुरव, राजू शेंडे, नितीन गुरव, हेमंत पवार, धनराज गुरव आदी उपस्थित होते.
यावेळी आ. अण्णा बनसोडे म्हणाले की, ‘देवस्थान इनाम वर्ग-3’ च्या जमीनी मालकी हक्काने, कब्जेदार सदर गुरव समाजाचे नावे लावणे, गुरव समाजातील युवकांना उद्योग, व्यवसायासाठी शासकीय अर्थसहाय्य मिळून देणे, सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी व महिलांसाठी शासकीय वसतीगृह उभारणे हे प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावू. तसेच बारा बलुतेदार आर्थिक व वित्तीय महामंडळ स्थापन करण्याबाबत पाठपुरावा करुन असे आश्वासन आ. बनसोडे यांनी दिले.
माजी राहुल जाधव म्हणाले की, या वधुवर परिचय मेळाव्यात जमणारे सर्व विवाह मार्च 2020 मध्ये होणा-या सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लावून देऊ. तसेच नवविवाहितांना संसार उपयोगी साहित्य देऊ.गुरव समाज शहराध्यक्ष श्रीहरी गुरव म्हणाले की, राज्यभर असणा-या देवस्थान, मंदिरांमध्ये विश्वस्त आणि वंशपरंपरेने मिळणारे पुजेचे अधिकार मिळावेत. गाभा-यात दानपेटी नसावी, मंदिरात पुजा करणा-या गुरव कुटूंबांस मंदिर परिसरात निवास व्यवस्था मिळावी, तसेच विकसीत होणा-या देवस्थानच्या शॉपिंग सेंटरमध्ये गुरव समाजाच्या व्यक्तींस प्राधान्यक्रमाने गाळे मिळावेत. ‘शिंगवादक’ (तुतारी वादक) हे महाभारताच्या काळापासून शिंगवादकाची परंपरागत कला पिढ्यानपिढ्या जोपासत आहेत. त्यांची ‘कलाकार’ म्हणून शासनाने नोंद घ्यावी. तसेच कला व सांस्कृतिक विभागाकडून कलाकारांना मिळणारे शासकीय मानधन व निवृत्ती वेतन मिळावे. ग्रामीण भागात गुरव समाजाची लोकसंख्या अत्यल्प आहे. जाचक रुढीपरंपरेतून गुरव समाजाला मुक्त करण्याचा व त्यांना धनदांडग्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी कायदा करावा. अशाही मुख्य मागण्या गुरव समाजाच्या आहेत.
या परिचय मेळाव्यात 225 इच्छुक वधु-वरांनी सहभाग घेतला होता. त्याची संगणकीय नोंदणी मंगेश क्षिरसागर, निखिल शिंदे, सुजित गुरव, अनिकेत पोरे, अभिजित मेलगिरी यांनी केले.स्वागत श्रीहरी गुरव, सिमा शिंदे, प्रास्ताविक भारत भोसले, सुत्रसंचालन पार्थ गुरव, आभार माधुरी गुरव यांनी मानले.