Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमीयंदाच्या दिवाळीत 'सॅल्यूट 2 सैनिक' म्हणून दिवा प्रज्वलित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

यंदाच्या दिवाळीत ‘सॅल्यूट 2 सैनिक’ म्हणून दिवा प्रज्वलित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे आव्हान

14 November 2020.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दीपावलीचा उत्सव देशाच्या सैनिकांसोबत साजरा करणार आहेत. २०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीरमधील भारतीय सैनिकांच्या तळावर जाऊन दिवाळी साजरी केली होती . 

यंदाच्या वर्षी देखील ते दिवाळी सनिकांसोबतच साजरी करणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण देशातील जनतेला एक दिवा सैनिकांच्या नावे प्रज्वलित करण्याचं आवाहन केलं. त्यांनी ट्वीट करुन सांगितलं की “ही  दिवाळी, आपण निर्भयपणे आपल्या देशाचे रक्षण करणारे सॅल्यूट 2 सैनिक म्हणून दिवा प्रज्वलित करूया.  सैनिकांच्या अनुकरणीय धैर्याबद्दल कृतज्ञतेचे  शब्द न्याय देऊ शकत नाहीत. आम्ही सीमेवर असलेल्यांच्या कुटूंबियांबद्दल कृतज्ञ आहोत.” असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

त्यामुळेच ह्या वर्षी आपण एक दिवा सैनिकांसाठी लावू असे त्यांनी सुचवले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments