Tuesday, February 27, 2024
Homeआंतरराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी आज पासून अमेरिका दौऱ्यावर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पासून अमेरिका दौऱ्यावर…

२२ सप्टेंबर २०२१,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (बुधवारी) सकाळी ११.०० वाजता अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. २६ सप्टेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांसोबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे. पाच दिवसांच्या आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान क्वॉड समिट, कोविड ग्लोबल समिटमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रालाही ते संबोधित करतील. करोना महामारीचा उद्रेक झाल्यापासून मोदींचा हा पहिलाच मोठा दौरा आहे.

बायडन – मोदी भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पदग्रहणानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची अमेरिकेत प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. बायडन हे अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना मोदी व त्यांच्यात बैठकी झाल्या होत्या. मोदी-बायडन यांच्या प्रत्यक्ष भेटीपूर्वी बायडन यांनी आयोजित केलेल्या करोना जागतिक परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत.

हॅरिस-मोदी गुरुवारी भेटणार

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी व्हाइट हाउसमध्ये भेट होणार आहे. यावेळी दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये लोकशाही, मानवाधिकार आणि हवामान या मुद्द्यांचा समावेश असल्याचे व्हाइट हाउसमधील अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments