Tuesday, February 27, 2024
Homeताजी बातमीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी -डॉ. कैलास कदम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी -डॉ. कैलास कदम

भाजपाच्या खासदारांमध्ये स्वाभिमान असेल तर राजीनामा द्यावा : डॉ. कैलास कदम

देशाचे संसद भवन म्हणजे १३० कोटी जनतेचे पवित्र मंदिर आहे. या पवित्र ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणारे वक्तव्य पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये भाषण करताना महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षामुळे देशभर कोरोनाचा फैलाव झाला असे वक्तव्य केले. त्यामुळेदेशभरातील कॉंग्रेस प्रेमींमध्ये आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याचा निषेधकरण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पिंपरी, मोरवाडी येथिल भाजपा कार्यालयासमोर बुधवारी (दि. ९ फेब्रुवारी) जमले होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम बोलत होते. यावेळीयुवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिलाशहराध्यक्षा सायली नढे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यु दहितुले, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, ॲड. उमेश खंदारे, तारीक अख्तर, दिनकर भालेकर, सतिश भोसले, अबुबकर लांडगे, विश्वनाथ जगताप, जेव्हीयर ॲन्थोनी, डॉ. मनिषा गरुड, संजीव झोपे, अयुब खान, प्रियांका मलशेट्टी, भाऊसाहेब मुगूटमल, मिलिंद बनसोडे, इस्माईल संगम, आबा खराडे, भारती घाग, उमेश बनसोडे, भास्कर नारखेडे, स्वाती शिंदे, लक्ष्मण रुपनर, हिरा जाधव, बाबा बनसोडे, विजय ओव्हाळ, जुबेर खान, किरण नढे, रवी नांगरे, रोहित भाट, निर्मला खैरे, सौरभ शिंदे,  विशाल सरवदे, सुप्रिया पोहरे, गणेश नांगरे, अनंत काटे, प्रकाश नांगरे, अजय काटे, शेख सोहेल, रेहाण शेख, सय्यदहमीद, माऊली मलशेट्टी, अनिता अधिकारी, हरिश डोळस, सुमिता जाधव, सुवर्णा कदम, गंगा नाईक, सोमी गिरी, शितल सिंकदर, संदीप शिंदे, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, प्रा. किरण खाजेकर, सीमा हलकट्टी, रिया फर्नांडिस, मोनिका पवार, रुपाली कटेकर, सुनिता मिसाळ, नयन पालांडे, सुधाकर कुंभार, छाया देसले, सिमा बिडवे, देविका सुर्यवंशी, बसवराज शेट्टी, निखिल भोईर, युनुस बाजवान, मनिषा साळवी, सुप्रिया कदमआदी उपस्थित होते.यावेळी डॉ. कैलास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीव्र शब्दात निषेध केला. 

महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदार, आमदार आणि राज्यातील महापालिकेतील भाजपा नगरसेवकांमध्ये महाराष्ट्राविषयी जर स्वाभिमानशिल्लक असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा निषेध करीत तात्काळ राजीनामे द्यावेत. कॉंग्रेसचे सरचिटणीस खा. राहुल गांधी यांनी देशातकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करावी अशी मागणी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करीत पंतप्रधान मोदीयांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत गुजरातमध्ये ‘नमस्ते इंडीया’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. देशातकोरोनाचा फैलाव होण्यास महाराष्ट्रातील कॉंग्रेस नाही तर पंतप्रधान मोदी यांचे ‘इवेन्ट’ आणि त्यांची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. देशभरकोरोनाचा फैलाव होत असताना पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ भाजपा विरोधी राज्यांमधील सरकारांना जाणून बुजून त्रास देणारे निर्णय घेऊनहीन दर्जाचे राजकारण करीत आहेत. कोरोनाच्या लसीकरणात देखील भाजपाने राजकारण केले. गुजरातची खरी आकडेवारी जाहिर केलीनाही. 

यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील कोट्यावधी नागरीकांनी शहरे सोडून मुळगावी स्थलांतर केले. यामध्ये देखीलहजारोंचा बळी गेला. वर्षभर दिल्लीत शेतक-यांनी आंदोलन केले यामध्ये देखील अनेक शेतक-यांचा दुर्देवी अंत झाला. याविषयी एकहीसांत्वनाचा शब्द पंतप्रधान मोदी यांनी उच्चारला नाही. मागील सात वर्षातील आपले अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान मोदी बेतालपणे कॉंग्रेसवरआणि महाराष्ट्रातील जनतेवर आरोप करीत आहेत अशा बेजबाबदार पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी आणि महाराष्ट्रातीलभाजपाच्या सर्व खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी राजीनामे देऊन आपला स्वाभिमान दाखवून द्यावा अशीही मागणी डॉ. कदम यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला. तसेच ज्येष्ठ नेत्या निगारबारसकर, शहर काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनीही भाषण केले 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments