Saturday, December 9, 2023
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, साईचरणी होणार नतमस्तक, दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर...

पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, साईचरणी होणार नतमस्तक, दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात नरेंद्र मोदी साईबाबांच्या समाधीच दर्शन घेऊन करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आज तिसऱ्यांदा ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.

2018 मध्ये साईबाबांच्या समाधीचं शताब्दी वर्ष होतं. या सोहळ्याची सांगता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातावरणकुलीत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचं लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.

आयुष हॉस्पिटलचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांच शुभारंभ होणार आहे. अहमदनगरच्या आयुष रुग्णालयाचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा अहमदनगर दौरा?

पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणार
त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करतील
पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार
यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल
पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील
सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश
या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील
प्रस्तावित दौऱ्यानुसार, दुपारी एकच्या सुमारास नरेंद्र मोदी साई मंदिरात पोहोचतील. साई मंदिरात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात येईल. त्याचबरोबर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही छोटेखानी आरतीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर साईबाबा संस्थानच्या 2024 च्या डायरीचा प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. या ठिकाणाहून दर्शन घेतल्यानंतर ते अकोले तालुक्यातील निळवंडेकडे जलपूजन कार्यक्रमासाठी रवाना होतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments