कोरोना लसीकरनाच्या तीसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम सुरू आहे. यातच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. ७५ वर्षीय राष्ट्रतींनी नवी दिल्लीमधील आर्मी हॉस्पीटल रिसर्च अॅण्ड रेफ्रल म्हणजेच आर. आर. रुग्णालयामध्ये करोनाची लस घेतली. एक मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.
देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनी लस घेतली.