Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीक्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनपर्वाचे पुर्व...

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रबोधनपर्वाचे पुर्व बैठकीचे आयोजन…

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रबोधन पर्वाचे कार्यक्रम समाजातील सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असेल. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी शहरात सर्व प्रभागात शहर स्वच्छतेसाठी प्लॉगेथॉन मोहिम राबवून बाबासाहेबांना अनोखे अभिवादन करण्याचा मनोदय असून सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या विचार प्रबोधन पर्वाची पूर्वनियोजन बैठक आज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, सुलक्षण धर, माजी नगरसदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, उत्तम हिरवे, अंकुश कानडी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अडागळे, आनंदा कुदळे, प्रताप गुरव, बाळासाहेब ढसाळ, एकता कर्मचारी संघटनेचे गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, निवृत्ती आरवडे, आरपीआय आठवले गटाचे सुधाकर वारभुवन, बाळासाहेब रोकडे, सुरेश निकाळजे, दशरथ ठाणांबीर, भाजपचे मनोज तोरडमल, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, एमआयएमचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, आझाद समाज पार्टीचे रहीम सैय्यद, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, हनुमंत माळी, प्रा. बी. बी. शिंदे, डॉ. धनंजय भिसे, भाऊसाहेब डोळस, सिकंदर सुर्यवंशी, प्रल्हाद कांबळे, अॅड बी. के कांबळे, नितीन गवळी, शाम सोनवणे, दिनकर ओव्हाळ, हौसराव शिंदे, चंद्रकांत बोचकुरे, राहुल सोनावणे, मिलिंद घोगरे, विशाल जाधव, धुराजी शिंदे, संतोष शिंदे, प्रकाश बुख्तर, विनोद गायकवाड, विशाल कांबळे, विजय ओव्हाळ आदींसह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करावी, मोकळ्या मैदानावर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करावे, विचार प्रबोधन पर्वामध्ये दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश असावा, स्थानिक कलाकारांना संधी द्यावी, कायदेतज्ञ अर्थतज्ञ जलतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी मांडणी करणारे कार्यक्रम घ्यावेत, कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करावी, दापोडी भागात देखील कार्यक्रम घ्यावेत, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करावे, पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुल १४ एप्रिल रोजी तात्पुरत्या स्वरुपात खुला करावा, ९ एप्रिल रोजी सम्राट अशोक यांची जयंती साजरी करावी, उद्योजगता आणि रोजगार प्रशिक्षण शिबीर घ्यावे, कौशल्य आणि विकास उपक्रम राबवावे, पिंपरी दापोडी आणि एच.ए. कंपनी आवारातील पुतळ्यांना विद्युत रोषणाई करावी आदी सूचना विविध व्यक्तींनी बैठकीत मांडल्या.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ख-या अर्थाने साजरी करण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविले पाहिजेत. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. १४ एप्रिल रोजी शहरात विविध ठिकाणी प्लॉगेथॉन मोहिम राबविली जाईल. शहर स्वच्छतेसाठी प्लॉगेथॉनचा उपक्रम महत्वपूर्ण असून समाज हितासाठी आवश्यक आहे. देश आणि संविधानाप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी या शहरात वेगळा आदर्श निर्माण केला असा संदेश देशभर जाण्यासाठी सर्वांचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त यांनी केले.बैठकीचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments