Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रविण शिर्के तर कार्याध्यक्षपदी अविनाश आदक यांची...

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रविण शिर्के तर कार्याध्यक्षपदी अविनाश आदक यांची निवड

पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर कार्याध्यक्षपदी राजू वारभुवन यांची निवड

मराठी पत्रकार संघ मुंबई सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाची द्विवार्षिक निवडणूक मार्च 2023 ते मार्च 2025 प्रक्रिया शनिवार दि.25/ 3 /2023 रोजी भा. वी. कांबळे पत्रकार कक्ष तिसरा मजला महापालिका भवन पिंपरी18 येथे पूर्ण झाली.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्षपदी- प्रविण शिर्के, कार्याध्यक्षपदी- अविनाश आदक, उपाध्यक्षपदी- माधुरी कोराड, गणेश मोरे, अविनाश पर्बत, सरचिटणीस- रोहित खगेँ, सहचिटणीस- सोमनाथ नाडे, खजिनदार- राम बनसोडे, समनवयक-राकेश पगारे, प्रवक्ता- झुबेर खान, कार्यकारीणी सदस्यपदी- तुळशीदास शिंदे, संतोष जाधव, सिताराम मोरे, प्रकाश जमाले, विशाल जाधव पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीपदी-अनिल भालेराव तर जिल्हा प्रतिनिधी-अनिल वडघुले यांची निवड झाली.

पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्षपदी- प्रशांत साळुंखे, कार्याध्यक्ष- राजू वारभुवन, उपाध्यक्ष-देवा भालके, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस-महाविर जाधव, खजिनदार-विनायक गायकवाड, समन्वयक-अशोक कोकणे, प्रवक्ता-अविनाश कांबीकर यांची निवड झाली.

पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षपदी- अर्चना मेंगडे, उपाध्यक्ष-सिता जगताप यांची निवड झाली.

तसेच पत्रकार भवन समन्वयकपदी-गोपाळ मोटघरे, पत्रकार कॉलनी समन्वयकपदी-उत्तम कुटे,सहसमन्वयक-दिनेश दुधाळे, पत्रकार महाविद्यालय समन्वयकपदी-विजय जगताप, सहसमन्वयक-प्रमोद गरड, पत्रकार प्रशिक्षण वर्ग समन्वयकपदी-गौरव साळुंखे, सहसमन्वयक- अजय कुलकर्णी, पत्रकार डिजिटल स्टुडिओ समन्वयकपदी-सुरज कसबे यांची निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी-बाळासाहेब ढसाळ होते. यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक-गोविंदजी वाकडे, विभागीय सचिव- नाना कांबळे हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments