Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीमुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांकडून हाय अलर्ट ड्रोनवर बंदी

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांकडून हाय अलर्ट ड्रोनवर बंदी

२७ ऑक्टोबर २०२०,
मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसात दिवाळीचा सण आहे. दिवाळी हा मुंबईतला मोठा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी मुंबईकर मोठया प्रमाणावर घराबाहेर पडतात. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करु शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत छोटया ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई होऊ शकते.

सध्या संपूर्ण देशात अनलॉकचा फेज सुरु आहे. करोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. गर्दीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्यासह सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन वारंवार यंत्रणांकडून केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments