Wednesday, July 15, 2026
Homeगुन्हेगारीअल्बम आणि स्टेज शो मध्ये काम करणारया मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱया...

अल्बम आणि स्टेज शो मध्ये काम करणारया मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱया दलालांना पोलिस सामाजिक सुरक्षा पथकांकडून अटक

व्हाट्सअपवरून कॉल करून वेगवेगळ्या लॉजवर मुली पाठवण्याचे काम आरोपी करत होते. संबंधित मुली त्यांच्या नावावर हॉटेलमध्ये रूम बुक करत होत्या. सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. २३) पुणे – मुंबई महामार्गावर ताथवडे येथील लॉजवर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा लावून लॉजवर छापा मारून कारवाई केली.

या मुलींमध्ये अल्बम आणि स्टेज शो मध्ये काम करणारी एक छत्तीसगडची अभिनेत्री आहे तर दुसरी राजस्थान तर तिसरी मुंबई येथील आहे. सुटका केलेल्या मुलींच्या माध्यमातून आरोपी जितेंद्र आणि हेमंत यांना वेश्या व्यवसायाचे पैसे नेण्याच्या बहाण्याने बोलावून पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपीकडून १० हजार रुपये रोख रक्कम, १ हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि १०० रुपयांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

आरोपींवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. जितेंद्र हस्तीमल बोकाडिया उर्फ हितेश हस्तीमलजी ओसवाल उर्फ महेश उर्फ विकी (वय ४८, रा. वाघोली. मूळ रा. राणी स्टेशन, जि. पाली, राजस्थान), हेमंत प्रणाबंधू साहू (वय ३२ रा. पुणे – नगर रोड, वाघोली, मूळ रा. कुसुमुंडिया, दासीपुर, पंगातीरा डिंगालाल परांगजाल उडीसा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मुकेश केशवाणी, करण, युसूफ उर्फ लंगडा शेख यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments