Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीपुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी…

पुणे जिल्ह्यात प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी…

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह सर्व पर्यटन जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णसंख्याही वाढू लागली होती. त्यामुळे आता निर्बंध अधिक कठोर करत पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातंय. गर्दी रोखण्यासाठी आणि संसर्ग वाढू न देण्यासाठी हे नवे निर्णय जाहीर करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी पोलिस प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, नेमक्या कोणकोणत्या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे, त्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील पर्यटन स्थळी जायला प्लॅन लोकांना रद्द करावा लागणार आहे.

कुठे कुठे बंदी?
पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन थंडीच्या दिवसात मौजमजा करण्यासाठी येत असतात. अशावेळी आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पर्यटन स्थळांना बंदी घालण्यात आली आहे. यामधील खालील पर्यटन स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर या खालील ठिकाणी आता थंडीच्या दिवसात पिकनिक काढण्याच्या इराद्यात असाल, तर तुम्हाला बेत रद्द करावा लागण्याचीच शक्यता आहे.

बंद करण्यात आलेली पर्यटन स्थळं खालीलप्रमाणे आहेत –

  • भुशी डॅम
  • घुबड तलाव
  • लोणावळा डॅम
  • तुंगार्ली डॅम
  • राजमाची पॉईंट
  • मंकी पॉईंट
  • अमृतांजन ब्रिज
  • वलवण डॅम
  • वेहेरगाव
  • टायगर पॉईंट
  • लायन पॉईंट
  • शिवलिंग पॉईंट
  • कार्ला लेणी
  • भाजे लेणी
  • लोहगड किल्ला
  • तुंग किल्ला
  • विसापूर किल्ला
  • तिकोणा किल्ला.
  • पवना धरण परिसर.
  • पवन मावळ
  • आंदर मावळ
  • नाणे मावळ
  • देहूरोड घोरावडेश्वर डोंगर
  • कुंडमळा धबधबा

आळंदीतील मंदिरही बंद राहणार… !

आळंदीमधील संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरही दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 14 जानेवारीच्या मकर संक्रातीला राज्यातील भाविक आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात. या गर्दीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून 13 जानेवारीच्या रात्री 8 वाजल्यापासून 15 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. एक परिपत्रक जारी करत आळंदी देवस्थानानं तसं जाहीर केलंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments