Wednesday, June 18, 2025
Homeताजी बातमीनिगडी जवळील सिध्दीविनायक नगरीमध्ये पीएमपीएमएलने नियमीत बससेवा सुरु करावी - महापौर उषा...

निगडी जवळील सिध्दीविनायक नगरीमध्ये पीएमपीएमएलने नियमीत बससेवा सुरु करावी – महापौर उषा उर्फ माई ढोरे

१३ जुलै २०२१,
निगडी येथील अप्पूघर जवळील सिध्दीविनायक नगरी भागातील रस्ते, ड्रेनेज आणि विद्युत दिवे यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच नियमीत बससेवा सुरु करण्याबाबत पीएमपीएमएलने उपाययोजना करावी अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

महापौर माई ढोरे यांनी प्रभाग अधिकारी, स्थापत्य, विद्युत, पीएमपीएमएल अधिका-यांसमवेत अप्पू घराच्या मागील परिसरातील सिध्दीविनायक नगरी, दत्तनगर, समर्थनगरी आशिर्वाद कॉलनी, श्रीविहार आदी भागाचा दौरा केला. या ठिकाणच्या रस्त्याचा काही भाग महापालिका हद्दीत तर काही भाग कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. तेथील नागरिकांनी त्याच्या समस्या महापौरांना सांगितल्या त्यावेळी त्यांनी अधिका-यांना सूचना दिल्या.

यावेळी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर,कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उपअभियंता संजय खरात, पीएमपीएमएलचे रामनाथ टकले, रविंद्र लांडगे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते प्रदीपकुमार बेंद्रे जाधवराव, दत्ता काळभोर, उमाशंकरसिंह, बन्सी रोडे, भूषण काळभोर, जयभगवानसिंग, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती ताम्हणकर, शिरवी, भाकरेताई आदी उपस्थित होते.

सिध्दीविनायक नगरी भागातील महिलांनी त्यांच्या भागातील समस्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या पुढे मांडल्या, रस्ते अतिशय खराब असल्याने महिलांना वाहतुकीस अडचण निर्माण होते. रस्त्यावरील काही दिवे रात्री बंद असतात त्यामुळे रात्री येण्याजाण्यास असुरक्षितता वाटते असे सांगून याबाबत ठोस उपाययोजना करण्याबाबत त्यांनी महापौरांना विनंती केली.

नागरिकांनी देखील त्यांच्या समस्या महापौरांना सांगितल्या. त्यामध्ये सिध्दीविनायक नगरी भागात प्रवेश करताना पेट्रोल पंपाजवळ मार्गदर्शक व दिशादर्शक मोठे फलक लावावेत. या ठिकाणी बसस्टॉपची आवश्यकता आहे. येण्या जाण्यासाठी नियमित बसची सोय करावी. या भागात जमिनीचा तीव्र उतार असल्याने पावसाळ्यात पाण्याचे लोंढे येतात त्यामुळे ड्रेनेज तुंबून पाणी रस्त्यावर येते. या समस्यांचा समावेश होता. तसेच काही डीपी धोकादायक स्थितीत असून ते सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्यात यावे, नागरिक येण्याजाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याचा वापर करतात. रस्ता अरुंद असल्याने रस्त्याचे रुंदीकरण करुन पदपथांची सोय करावी आणि हा भाग ऐतिहासिक भक्ती शक्ती समूह शिल्पाजवळ असल्याने या भागातील रस्त्यांचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी विनंतीही या भागातील नागरिकांनी महापौर माई ढोरे यांना केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments