Tuesday, December 10, 2024
Homeताजी बातमीपीएमपीएमएलच्या कर्मचा-यांचा सातवा वेतन आयोगाचा लाभ द्यावा : अमित गोरखे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे...

पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांचा सातवा वेतन आयोगाचा लाभ द्यावा : अमित गोरखे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ अद्याप मिळालेला नाही. या संदर्भात पीएमपीएमएल प्रशासन व निधी उपलब्ध करून देणा-या पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला आदेश द्यावेत आणि कर्मचा-यांचा हा वेतन आयोगाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मंत्री तथा सचिव अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित गोरखे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये गोरखे यांनी म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागु करण्यासाठीचा ठराव माहे २०२१ मध्येच मंजुर करुन अतिरिक्त निधी दोन्ही महापालिका पीएमपीएमएलला उपलब्ध करून देणार असल्याचे लेखी कळविले आहे. याबाबत दोन्ही महापालिकेच्या स्थायी समितीने व महापालिकेच्या महासभेने देखील मान्यता दिलेली आहे.

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकासहित लागु करणेबाबत दोन्ही महापालिकांनी सन २०२२-२३ या अंदाजपत्रकात तरतुद केलेली आहे. परंतु, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने कर्मचा-यांमध्ये असंतोष पसरलेला आहे. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागु करणेबाबत महापालिकेकडुन अधिकचा निधी उपलब्ध करून देणेबाबत दोन्ही महापालिका आयुक्त यांना पीएमपीएमएल प्रशासनाकडुन याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.

रविवारी दि. २१/०८/२०२२ रोजी आपण पुणे स्टेशन येथे ईलेक्ट्रीक बस डेपोच्या उद्घाटन प्रसंगी येणार आहेत, असे समजते. याचं कार्यक्रमात पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा सातवा वेतन आयोग लागु करत असले, बाबतची घोषणा करावी. तसेच, पीएमपीएमएल सेवकांना सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्याकामी पुणे महापालिका हिश्याचे ६ कोटी रुपये व पिंपरी चिंचवड महापालिका हिश्याची रक्कम ४ कोटी रुपये पीएमपीएमएलला उपलब्ध झाली नसल्याने वेतन आयोग लागु करण्यास अडचणी येत आहेत. तरी पुणे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका हिश्याची रक्कम तातडीने पीएमपीएमएलला उपलब्ध करून देणे बाबत दोन्ही महापालिकाआयुक्त तथा प्रशासक यांना आपल्या वतीने आदेश द्यावेत, असे अमित गोरखे यांनी निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात लवकरच योग्य कार्यवाही करण्याबाबत देवेंद्रजींनी आश्वस्त केल्याचे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments