Monday, October 7, 2024
Homeताजी बातमीपीएमसीने 10 ऑगस्ट रोजी शहरातील अनेक भागात पाणीकपात जाहीर केली

पीएमसीने 10 ऑगस्ट रोजी शहरातील अनेक भागात पाणीकपात जाहीर केली

पुणे महानगरपालिकेने (PMC) 10 ऑगस्ट रोजी शहरातील अनेक भागांसाठी पाणीकपात जाहीर केली आहे कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ लिमिटेड (MSEDCL) पार्वती जल केंद्राच्या देखभालीचे काम करणार आहे. त्यामुळे नमूद भागात १० ऑगस्टला पाणीपुरवठा होणार नाही तर ११ ऑगस्टला कमी दाबाने पुरवठा होण्याची शक्यता आहे.

ज्या भागात 10 ऑगस्टला पाणीकपात होणार आहे:-

१. पार्वती एमएलआर (MLR) टँक क्षेत्र:

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, इ.

२. पार्वती एचएलआर (HLR )टँक क्षेत्र:

सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर, इ.

३. पार्वती एलएलआर (LLR ) टँक क्षेत्र:

शहरातील सर्व पेठ परिसर, दत्तवाडी, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट इ.

४. SNDT MLR टँक क्षेत्र:

एरंडवणे, कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हॅपी कॉलनी, मयूर कॉलनी, सहवास सोसायटी परिसर इ.

५. चतुरश्रृंगी टाकी क्षेत्र:

औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, चिखलीवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, इ.

६. लष्कर जल केंद्र क्षेत्र:

लष्कर परिसर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, इ.

७. लष्कर जल केंद्र क्षेत्र:

लष्कर परिसर, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, इ.

८. वडगाव जल केंद्र क्षेत्र:

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पाथर, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, इ.

याशिवाय 10 ऑगस्टला पाणी बंद असल्याने या भागात 11 ऑगस्टला कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी त्याची नोंद घेऊन आवश्यक ती तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments