Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींची नाशिक भेट , राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आणि काळाराम मंदिरात...

पंतप्रधान मोदींची नाशिक भेट , राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आणि काळाराम मंदिरात दर्शन …

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.

राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन येथील मोदी मैदानावर होणार आहे. या महोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरु असून नाशिकचं रूपडं पालटलं आहे. ठिकठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेकडून शहर चकाचक करण्य्यात आले आहे. तर जाणून घेऊयात नाशिकचा राष्ट्रीय युवा महोत्सव नेमका काय?

का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा महोत्सव?
स्वामी विवेकानंदांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस. या निमित्त ‘राष्ट्रीय युवा दिनाचे’ आयोजन केले जाते. या दिवसापासून सुरू होणारा आठवडा ‘राष्ट्रीय युवा सप्ताह’ म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय युवा सप्ताह उत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करते. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा हा कार्यक्रम आहे.

यंदा नाशिकला बहुमान
दरवर्षी एका राज्यामध्ये संयुक्त उपक्रम साजरे केले जातात. देशभरातील तरुणांचे मेळावे आयोजित करून आणि त्यांना विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो. यंदा हा मान नाशिकला मिळाला आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन अन् भव्य रोड शो
नाशिकच्या तपोवन येथील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यावर हेलिपॅडपासून ते कार्यक्रमळापर्यंत ते असा रोड शो करणार आहेत. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोदी यांचा रोड शो होणार आहे. रस्त्याच्या एका बाजूने रोड शो होईल तर दुसऱ्या बाजूने संस्कृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मोदींच्या रोड शोला सुमारे एक ते दीड लाख लोकं उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

लोगो आणि थीम अशी
महाराष्ट्राला तब्बल १६ वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. २७ व्या या महोत्सवाची थीम ‘विकसित भारत २०४७’ अशी ठेवण्यात आली आहे. त्याचे प्रतीक दर्शविणारा ‘सक्षम युवा, समर्थ भारत’ असे घोषवाक्य व महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरु (मॅस्कॉट) यांचा या लोगोत समावेश करण्यात आला आहे, अलीकडेच केंद्रीय क्रीडा व सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोगो आणि थीमचे अनावरण करण्यात आले होते.

20 समित्या, 75 अधिकाऱ्यांवर जबाबदारी
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठीएकूण 20 समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 75 शासकीय अधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. शहरात तपोवन परिसरातील 16 एकर मैदानावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments