३० डिसेंबर,
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या से. नं.३२ रावेत येथील ३४.५ मी. रस्त्याला लागुन असलेली नियोजित स्मशानभूमी रद्द करणेबाबत मा. आयुक्त यांचे दालनात आज बैठक झाली. सदर नियोजित स्मशानभूमीच्या लगत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्यामुळे या स्मशानभूमीसाठी तेथील नागरिकांचा तीव्र विरोध होता. त्यानुषंगाने येथील नागरिकांनी नगरसेवक, पदाधिकारी व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचेकडे सदर स्मशानभुमी रद्द करणेबाबत वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे वेळी सदर स्मशानभुमी या ठिकाणावरुन इतर ठिकाणी स्थलांतरीत करणेचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज दि. ३०/१२/२०१९ रोजी मा. आयुक्त यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये से. नं. ३२ रावेत येथील ३४.५ मी. रस्त्याला लागुन असलेली नियोजित स्मशानभूमी रद्द करणेबाबत सर्वानुमते निर्णय करणेत आलेला आहे. सदर ठिकाणी नियोजित स्मशानभुमीच्या जागेवर सुसज्ज असे उद्यान विकसित करणेबाबत मा. आयुक्त यांनी आदेशीत केले आहे. या निर्णयामुळे तेथील रहिवाशांना मोठ्या प्रकारचा दिलासा मिळालेला आहे. सदर बैठकीसाठी नगरसेवक नामदेव ढाके, भाऊसाहेब भोईर, नगरसेविका संगिताताई भोंडवे, करुणाताई चिंचवडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, मनिषा कुंभार, श्री.वसईकर तसेच कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, सतिश इंगळे व इतर अधिकारी उपस्थित होते.