पिंपळे सौदागर येथील छत्रपती चौक, कुणाल आयकॉन रोडवरील नवीन बांधकामाच्या ठिकाणी दरड कोसळली…
पिंपळे सौदागर येथील छत्रपती चौकातील कुणाल आयकॉन रोडवरील नवीन बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी पहाटे दरड कोसळली. या घटनेमुळे रास्ता रोखण्यात आला आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.या घटनेनंतर रस्त्यावरील पाणी पुरवठा लाईन व स्ट्रीम वॉटर लाईनचे नुकसान झाले. सकाळच्या व्यायामासाठी बाहेर पडलेल्या रहिवाशांच्या तसेच जवळच्या सोसायटी परिसरात राहणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. विलंब न लावता त्यांनी तातडीने नागरी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग आणि पोलिस प्रशासनाला परिस्थितीची माहिती दिली.
पोलिस आणि महापालिका विभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी परिसर सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेड्स लावले आहेत. दरम्यान, नागरी आपत्कालीन विभाग आणि पाणीपुरवठा विभाग पाइपलाइन आणि रस्ता या दोन्ही दुरुस्तीचे काम जोमाने करत आहेत.