Tuesday, April 21, 2026
Homeअर्थविश्वज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार “ पिंपरी चिंचवड सन्मान –...

ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार “ पिंपरी चिंचवड सन्मान – 2026”

पिंपरी चिंचवड : News14 Media Network यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या “पिंपरी चिंचवड सन्मान 2026” या प्रतिष्ठित सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व प्रगल्भ वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस लाभणार आहेत , त्यांचे बहुमूल्य विचार नक्कीच प्रेरणा देतील. 

यंदा या सन्मान सोहळ्याचे तिसरे वर्ष असून अल्पावधीतच या पुरस्काराने शहरात मानाचे स्थान निर्माण केले आहे. यापूर्वीच्या सोहळ्यांमध्ये पद्मश्री सन्मानित समाजकार्यकर्ते गिरीश प्रभुणे तसेच अर्जुन पुरस्कार विजेते आणि पद्मश्री सन्मानित पॅरा-स्विमर मुरलीकांत पेटकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले होते. त्यामुळे या सन्मानाची परंपरा अधिक भव्य आणि प्रेरणादायी ठरली आहे.

डॉ. सबनीस हे मराठी साहित्यविश्वातील मानाचे आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, साहित्यिक परंपरेच्या जतनासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी दीर्घकाळ कार्य केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मराठी साहित्याला व्यापक वैचारिक दिशा दिली. त्यांच्या भाषणांमध्ये सामाजिक समता, विवेकनिष्ठ विचार आणि प्रगत मूल्यांचा ठाम पुरस्कार आढळतो.

“पिंपरी चिंचवड सन्मान 2026” हा सोहळा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना या व्यासपीठावर सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. सबनीस यांच्या अध्यक्षतेमुळे या कार्यक्रमाला अधिक वैचारिक अधिष्ठान आणि प्रतिष्ठा लाभणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.

हा कार्यक्रम

📅 शनिवार, दि. ७ मार्च २०२६

🕓 सायं. ४:०० वाजता

📍 सायन्स पार्क, चिंचवड तारांगण सभागृह, पुणे

येथे आयोजित करण्यात आला आहे.

शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन  News14 Media Network चे संपादक अविनाश कांबीकर यांनी केले आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments