पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी News14 Media Network तर्फे “पिंपरी चिंचवड सन्मान – 2026” या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सलग तिसऱ्या वर्षी आयोजित होत असून, “सन्मान कार्याचा – गौरव शहराचा” या ब्रीदवाक्याखाली शहराच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात देशातील अग्रगण्य शहर म्हणून ओळखले जाते. या शहराच्या यशामागे अनेक समर्पित व्यक्तींचे योगदान असून, त्यांनी शहराची ओळख राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आहे. अशा व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात येत आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सध्या सुरू असून, विविध क्षेत्रातील नामवंत तसेच कर्तृत्ववान व्यक्तींनी आपली संपूर्ण प्रोफाईल, कार्याचा तपशील व संपर्क माहिती news14pcmc@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन News14 Media Network तर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून, नामवंत पाहुण्यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रम भव्य व प्रेरणादायी स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
या संदर्भात बोलताना News14 Media Network चे संचालक श्री. अविनाश किसनराव कांबीकर यांनी सांगितले की, “शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना योग्य व्यासपीठावर सन्मानित करणे हा आमचा उद्देश आहे. पिंपरी चिंचवड सन्मान हा केवळ पुरस्कार नसून, शहराच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव आहे.”
अधिक माहितीसाठी www.news14live.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी :
श्री. अविनाश किसनराव कांबीकर
संचालक – News14 Media Network
मोबाईल : 9822696578
ई-मेल : news14pcmc@gmail.com


