Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रजेष्ठ व्यावसायिकाच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकून लुटणाऱ्या चौघांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जेष्ठ व्यावसायिकाच्या डोळ्यात मिर्चीपूड टाकून लुटणाऱ्या चौघांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी चिंचवड शहरातील येथील जेष्ठ व्यवसायिकाच्या तोंडावर मिर्चीपूड फेकून मनी ट्रान्सफरचे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन पसार झालेल्या चार जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ लाख ३५ हजार रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी व्यवसायिक प्रकाश भिकचंद लोढा यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

विशाल साहेबराव जगताप, जावेद अकबर काझी, अभिषेक दयानंद बोडके आणि धिरेंद्रसिंग असवानी सिंग यांना पोलिसांनी अटक केली असून लालबाबू बाजीलाल जयस्वाल हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ व्यवसायिक प्रकाश लोढा यांना गेल्या आठवडयात रात्री पावणे आकाराच्या सुमारास लुटण्यात आले होते. त्यांच्या तोंडाला मिर्ची पावडर चोळून मनी ट्रान्सफर चे २७ लाख २५ हजार रुपये घेऊन आरोपी पसार झाले होते. लोढा हे तीन ठिकाणची मनी ट्रान्सफर ची एकूण रक्कम २७ लाख २५ हजार रोख रक्कम गोळा करून स्कुटर वरून राहते घरी दुर्गानगर येथे जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी स्कुटरला धक्का देऊन त्यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर टाकली आणि धक्का- बुक्की करत लाखोंची रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व युनिट आणि गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments